Crime News : खुनाचा गुन्हा ४८ तासांत उघडकीस, एक ताब्यात
Omerga News : उमरगा तालुक्यातील दस्तापूरजवळील दाळिंब गावात घडलेल्या खून प्रकरणाचा तपास पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत उलगडला असून, एकास अटक करण्यात आली आहे. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचे समोर आले आहे.
उमरगा : दस्तापूर परिसरातील दाळिंब खून प्रकरणात एकाला अटक करण्यात आली. पोलिसांना ४८ तासांत गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले असून, दोघांनी पूर्ववैमनस्यातून खून केल्याचे समोर आले आहे.