esakal | घनसावंगी तालुक्यात चार हजार हेक्टर पिकांचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

घनसावंगी तालुक्यात चार हजार हेक्टर पिकांचे नुकसान

घनसावंगी तालुक्यात चार हजार हेक्टर पिकांचे नुकसान

sakal_logo
By
सुभाष बिडे, घनसावंगी

घनसावंगी (जालना) : घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टीने अंदाजे चार हजार 718 हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहीती तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी 'सकाळ'ला दिली.

घनसावंगी तालुक्यात मागील दोन दिवसापूर्वी तिर्थपुरी मंडळात सर्वाधीक 121.3 मिलीमीटर, घनसावंगी मंडळात 78 मिलीमीटर, कुंभारपिंपळगाव 85.8 मिलीमीटर, अंतरवाली टेंभी मंडळात 86.3 मिलीमीटर, रांजणी मंडळात 35 मिलीमीटर, जांबसमर्थ 55.8 मिलीमीटर, राणीउचेंगाव मंडळात 34.3 मिलीमीटर पाऊस झाला असून एकाच दिवसी सरासरी 70 .9 मिलीमीटर पाऊस झाला. त्याचबरोबर दोन दिवस ही सतत धार पाऊस सुरूच असल्याने अंतरवाली टेंभी व घनसावंगी मंडळातील खरिप हंगाङ्कातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, कापूस, सोयाबीन, मूग ही पिके पाण्याखाली गेली तसेच या परिसरातील जनावरे, घरांची पडझड, पूलाचे नुकसान झाल्याचे वृत आहे.

मंगरूळ येथील जुन्या काळात बांधण्यात आलेला जलसंधारण विभागांचा पाझर तलाव फुटल्याने या परिसरातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानुसार घनसावंगी तालुक्यात अंतरवाली टेंभी मंडळातील मंगरूळ : 1072 हेक्टर, अंतरवाली टेंभी : 1072 हेक्टर, भोगगाव : 320 हेक्टर, कोठी : 125 हेक्टर, मुद्रेगाव : 125 हेक्टर, तिर्थपुरी मंडळात जोगलादेवी : 32 हेक्टर, खालापुरी : 312 हेक्टर, रामसगाव : 45 हेक्टर, दहीगव्हाण बुद्रूक : 155 हेक्टर, एकरूखा : 177 हेक्टर, सौदलगाव बुद्रूक : 305 हेक्टर, शेवता : 340 हेक्टर, बानेगाव : 540 हेक्टर असे एकूण 13 गावात 4 हजार 718 हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमीक अंदाज असून या गावांत स्थानीक ग्राामसेवक, तलाठी, कृषीसहाय्यक यांना त्या त्या गावांचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार दिले असल्याचे नरेंद्र देशमुख यांनी सांगीतीले.

loading image
go to top