
बीड : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या रविवारी (ता. २६) होणाऱ्या वर्धापन दिनी राजपथावर २२ लढाऊ विमाने, ११ वाहतूक विमाने, सात हेलिकॉप्टर आणि तटरक्षक दलाची तीन डॉर्नियर पाळत ठेवणारी विमाने अशा ४० विमानांद्वारे या वर्षी फ्लायपास्ट दोन टप्प्यांत होईल. याच वेळी एअरफोर्सच्या १४४ जवानांची तुकडी पथसंचलन करणार असून पथसंचलनाचे नेतृत्व करणाऱ्या चौघांच्या फळीत जिल्ह्यातील दामिनी देशमुख यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्णया हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर ध्वजाला मानवंदना देण्यासाठी विमानातून पुष्पवृष्टी करण्याची धुराही एअरफोर्समधील फ्लाईंग लेफ्टनंट असलेल्या दामिनी देशमुख यांच्यावर आहे. जिल्ह्यासाठी ही अभिमानाची आणि गौरवाची बाब मानली जात आहे.