उदगीर, (जि. लातुर) - शहरातील एसटी कॉलनीत भाड्याने राहत असलेल्या एका घरात अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या वेळी घराचे कुलुप कोंडी तोडुन त्यामधील कपाटातील अंदाजे दहा तोळे सोन्याचे दागिने, दहा हजार रुपये रोख आणि घरासमोर लावलेली दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे.अज्ञात चोरट्याविरुध्द ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.