

जिंतूर : तालुक्यातील तालुक्यातील आसोल येथील जेष्ठ नागरिक दशरथ दराडे यांच्या अर्धांगिनी सावित्राबाई दराडे यांचे गेल्यावर्षी ( ७ डिसेंबर) निधन झाले. त्यांची आठवण म्हणून समाजासाठी कांहीतरी करावे या हेतूने दशरथ दराडे, मुलगा डॉ.श्रीहरी दराडे, सुन प्रतिभा दराडे, नातु आर्यन व अर्णव यांनी (कै.)सावित्रीबाई यांच्या स्मरणार्थ बँंकेत एक लाखाची ठेव (एफ.डी) ठेवून त्यावर मिळणाऱ्या व्याजातून दरवर्षी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांसाठी खर्च करण्याचे ठरविले.