Date Palm Farming : परतूरच्या मातीत फुलवली खजूर बाग; कृष्णा किटाळे यांचा प्रयोग, चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा
Agriculture Success : मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात कृष्णा किटाळे यांनी खजूर लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांच्या शंभर झाडांची बाग बहरली असून, यंदा चांगले उत्पादन होईल, अशी आशा आहे.
परतूर : खजूर म्हटले, की आपल्याला सौदी अरेबिया किंवा इराण-इराकसारखे आखाती देश आठवतात. मात्र, मराठवाड्यातील जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील शेतकरी कृष्णा किटाळे यांनी खजूर लागवडीचा प्रयोग केला आहे.