Fake Police Scam : मुरुड मध्ये भर दिवसा अंगावरील सोन्याचे दागिने पळवले; पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील घटना
Jewelry Safety : मुरुड लातूर येथे बनावट पोलीस बनून नागरिकांची फसवणूक करत दागिने चोरीस नेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुरुड : दुकानात धाड पडली आहे सोने अंगावर घालून फिरू नका गाडीच्या डीकित ठेवा असे सांगून पोलीस असल्याची बतावणी करत अंगावरील दागिने गाडीच्या डीकित ठेवण्याच्या बहाण्याने भरदिवसा दागिनेलंपास केल्याची घटना मुरुड ता. लातूर येथे 8 जानेवारी रोजी घडली.