Sand Tractor Seized
sakal
निलंगा - तालुक्यातील वाळू घाटावर अवैध रित्या बेसूमार वाळूचा उपसा सुरू असून यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. एरव्ही रात्री बोटीद्वारे होणारा वाळचा उपसा दिवसा ढवळ्या सुरू आहे. टिप्पर, ट्रक्टरने वाळूची विक्री सुरू असून याकडे महसूल व पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. औरादशहाजानी ता. निलंगा येथे केवळ एका वाहनावर पोलिसात गुन्हा दाखल केला मात्र दिवसा चालणाऱ्या बोटी व वाहने दिसत नाही का? असा सवाल केला जात आहे. महसूल प्रशासनाने एक कारवाई करून डोंगर पखरून उंदीर काढल्यागतचा गवगवा केला जात आहे. अद्याप पर्यंत एकाही तलाठी व मंडळ आधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात अवैध वाळू प्रकरणी कारवाई झाली नसल्याची बाब उघड झाली आहे.