Deaf and Mute Youth shadul daulatabadi Stages Sholay Style Protest
sakal
लोहा - कोणत्या कारणास्तव कोण काय करील याचा नेम राहीला नाही. मुखेड तालुक्यातील एका चाळीस वर्षीय मूकबधिर तरूणाने चक्क मोबाईलच्या टॉवरवर चढून स्वतःच्या पत्नीसोबत असलेले बॅनर झळकवत चार तास शोले स्टाईल आंदोलन केले. त्याला कारणही तसेच, पत्नीस सासरची मंडळी नांदण्यास पाठवीत नसल्याने त्याने अशी शक्कल लढवली असावी. चार तासानंतर त्याची पत्नी टॉवरनजीक येऊन त्याच्याशी व्हिडिओ कॉलिंगद्वारे बोलल्यानंतर तो पोलिसांच्या मदतीने खाली उतरला. सदरील घटना (ता. ७) सकाळी सहा ते सात वाजताच्या दरम्यान घडली.