esakal | सहाय्यक फौजदाराचा कर्तव्यादरम्यान मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

सहाय्यक फौजदार साहेबराव राठोड (वय ५७) यांचे गुरुवारी (ता. दोन) पहाटे तीनच्या सुमारास निधन झाले. ते बुधवारच्या रात्री कर्तव्यावर हजर होते.

सहाय्यक फौजदाराचा कर्तव्यादरम्यान मृत्यू 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : वजिराबाद पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार साहेबराव राठोड (वय ५७) यांचे गुरुवारी (ता. दोन) पहाटे तीनच्या सुमारास निधन झाले. ते बुधवारच्या रात्री कर्तव्यावर हजर होते. कामाच्या ताणतणावातून त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलल्या जात आहे. 

नांदेड पोलिस दलात सहाय्यक फौजदार म्हणून साहेबराव राठोड हे वजिराबादच्या पोलिस ठाण्यात ते कार्यरत होते. त्यांना बुधवारी रात्रीचा बंदोबस्त लावण्यात आला होता. ते नेहमीप्रमाणे आपल्या कर्तव्यावर बुधवारी (ता. एक) रात्री हजर झाले. त्यांची ड्यूटी पीसीआर मोबाईलवर लावण्यात आली होती. कर्तव्यावर असतांना त्यांची प्रकृती खालावली. 

कामाच्या ताणतणावामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलल्या जात आहे

लगेच त्यांना नांदेडच्या विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात दाखल केले. तोपर्यंत त्यांचा रक्तदाब कमी झाला होता. उपचार सुरू असतांनाच त्यांना तिव्र ह्रदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांचा मुत्यू झाला. सततच्या बंदोबस्तामुळे व कामाच्या ताणतणावामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलल्या जात आहे. शासकिय रुग्णालयात जावून पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांनी भेट दिली. त्यांच्या पार्थीवावर उत्तरीय तपासणी केल्यानंतर पार्थीव त्यांचे मुळ गाव शेकापूर, काशिनाथ तांडा (ता. कंधार) येथे नेऊन शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

हेही वाचा - प्रती व्यक्ती पाच किलो तांदुळ मिळणार मोफत

शेतमजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

वाई बाजार ( माहूर) : वाई बाजार येथून जवळच असलेल्या अमीनगुडा (ता. माहूर) येथील शेतमजूर अनिल बद्दू पुरके हा अंजनखेड शिवारात असलेल्या लक्ष्मण आत्राम यांच्या शेतात भुईमूग पिकाला पाणी देण्यासाठी (ता. ३१) रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घरून गेला होता. शेतात पाणी उपसा करणाऱ्या मोटर पंपामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने अनिल बद्दू पुरके (वय ४०) याचा जागीच मृत्यू झाला.

पोलिस ठाणे सिंदखेड येथे आकस्मिक मृत्यूची नोंद 

संध्याकाळ झाली तरी घरी परत न आल्यामुळे घरचे लोक शेताकडे गेले असता हा प्रकार उघडीस आला. पोलिस ठाणे सिंदखेड येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करून घटना स्थळी पंचनामा करून मृतहेद उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वाई बाजार येथे आणून डॉ. श्रीनिवास हुलसुरे व ईवळेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. संदेश राठोड यांनी बुधवारी (ता. एक) दुपारी एक वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांना सुपूर्द करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी वनिता, मुलगा योगेश व मुलगी रेखा, प्रियंका असा परिवार आहे.
 

loading image