परभणी जिल्ह्यातील कुपटा येथील कोंबड्यांचा मृत्यु ‘बर्ड फ्लू’ मूळेच

2H
2H

सेलू ः कुपटा (ता.सेलू) येथे शेकडो कोंबड्यांचा अज्ञात रोगामूळे मृत्यु झाल्याचे मंगळवारी (ता.११) उघडकीस आले होते. शुक्रवारी (ता.१५) त्या कोंबड्यांचा मृत्युचा अहवाल प्राप्त झाला असून त्या कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’  मूळेच झाल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

उपाययोजना सुरु 
जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्या शुक्रवारी (ता.१५) प्राप्त आदेशानुसार कुपटा (ता.सेलू) येथील ‘बर्ड फ्लू’ची लागण झाल्याची पुष्टी तपासणीतून झाली आहे. त्यामुळे आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यात येत असल्याची माहिती तहसिलदार बालाजी शेवाळे यांनी दिली.

पशु पालकांनी माहिती दिली होती 
कुपटा (ता.सेलू) येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या शंभर मिटर अंतरावरील आखाड्यावरच्या शेकडो कोंबड्यांचा मृत्यु अज्ञात रोगाने झाला असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले होते. जिल्ह्यात कोंबड्या मृत्युमुखी पडत असल्याची माहिती पशु पालकांनी पशुवैद्यकीय अधिकारी यांना मागील काही दिवसांपुर्वीच दिली होती.

पशु पालक व गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण 
कुपटा (ता.सेलू) येथे नुकतेच कोरोनाचे संकट कमी होत असतांनाच नवीन वर्षाच्या सुरुवातीला पशु पक्षांवर अज्ञात आजाराने घाला घातला असून बघता बघता पशु मृत्युमुखी पडत आहेत. अश्याच प्रकारे तालुक्यातील कुपटा येथे कोंबड्याचा मृत्यु झाला असल्याने पशु पालक व गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कुपटा (ता.सेलू) येथे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एकचा दवाखाना असताना त्या लगत असलेल्या शंभर मिटर वरिल मोहन जाधव, समाधान दुधवडे, राधेशाम हिवाळे, अनवर पठाण, संजय साळवे यांच्यासह गावकऱ्यांच्या शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडल्याने पशुपालक आणि गावकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले होते. शुक्रवारी अज्ञात रोगाने मेलेल्या शेकडो कोंबड्यांचा आहवालात बर्ड फ्लू ची लागण झाल्याची पुष्टी तपासणीतून झालेली आहे, अशी माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली असल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.


संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com