बीड जिल्ह्यात विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्‍यातील निमगाव मायंबा येथे  उदय भागवत कुरे (वय 15) हा विहिरीत बुडून मृत्युमुखी पडला.

शिरूर कासार (जि. बीड) -पोहताना विहिरीच्या पाण्यात बुडून विद्यार्थी मरण पावल्याची घटना रविवारी (ता. आठ) तालुक्‍यातील निमगाव मायंबा येथे घडली. उदय भागवत कुरे (वय 15) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. 

उदय कुरे हा निमगाव मायंबा येथील निगमानंद विद्यालयात दहावीत शिक्षण घेत होता. रविवारची सुटी असल्याने मुलांनी पोहण्याची इच्छा व्यक्त केली. भागवत कुरे आपल्या दोन्ही मुलांना घेऊन विहिरीवर पोहण्यासाठी गेले. पोहत असताना उदय कुरे पाण्यात बुडाला. त्याला विहिरीबाहेर काढले; परंतु तोपर्यंत उशीर झाला. त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The death of a student

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: