पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

पूर्णा (जि.परभणी) तालुक्यातील निळा या गोदाकाठावरील गावातील कल्याण सूर्यवंशी (वय १५) व ज्ञानेश्‍वर सूर्यवंशी (वय १८) हे दोघे कंठेश्‍वर येथील पूर्णानदीवरील बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेले होते. यावेळी पोहत असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. 

पूर्णा (जि.परभणी) : पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी(ता.३०) कंठेश्‍वर बंधाऱ्यावर घडली. हे दोन्ही मुले निळा (ता.पूर्णा, जि.परभणी) येथील होते.
पूर्णा तालुक्यातील निळा या गोदाकाठावरील गावातील कल्याण सूर्यवंशी (वय १५) व ज्ञानेश्‍वर सूर्यवंशी (वय १८) हे दोघे कंठेश्‍वर येथील पूर्णानदीवरील बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेले होते. यावेळी पोहत असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. 

ग्रामस्थांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव
घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या दोन्ही बालकांचे मृतदेह ताब्यात घेतले. कंठेश्‍वरच्या आरोग्य केंद्रात त्यांचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. सायंकाळी सात वाजता मृत्यू झालेल्या दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्देवी घटनेमुळे गावात मोठी शोककळा पसरली आहे.

हेही वाचा ...
गळफास लावून एकाची आत्महत्या
सेलू (जि.परभणी) :
सोनवटी (ता.सेलू) येथील मधुकर दत्तराव सोळंके (वय ५०) यांनी शुक्रवारी (ता.२९) रात्री गळफास लावून आत्महत्या केली असल्याची घटना घडली.
सोनवटी येथे मधुकर सोळंके हे आपल्या आईसह येथे राहत होते. मधुकर सोळंके नेहमी प्रमाणे शुक्रवारी रात्री झोपले. त्यांची आई घराबाहेर झोपली होती. हा प्रकार शनिवारी (ता. ३०) सकाळी उघडकीस आला. परमेश्वर सोळंके यांनी दिलेल्या महितीवरुन पोलिस कर्मचारी जी. बी. गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. गळफास घेण्याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.

 हेही वाचा : धक्कादायक ...! उघड्या वाहनातून रक्ताची वाहतुक -

 हेही वाचा...

जिंतूर तालुक्यात धाडसी चोरी; दोन लाख ३८ हजाराचा ऐवज लंपास

जिंतूर (जि.परभणी) ः दाराची कडी उघडून चोरट्यांनी घरातील सोन्याचांदीचे व रोख रकमेसह दोन लाख ३७ हजाराचा ऐवज लंपास केला. सदरची घटना शहरापासून पंचवीस कि. मी. अंतरावरील गडदगव्हाण (ता.जिंतूर) येथे शुक्रवारी (ता.२८) मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले. या घटनेवरून रात्रीच्यावेळी बेजबाबदारपणे दाराला कडी लावून वाटोडे या मजरदार कुटुंबियांना चांगलेच महागात पडले.

गडदगव्हाण येथील मिलिंद कुंडलिकराव वाटोडे हे शुक्रवारी (ता.२८) रात्री जेवण आटोपल्यावर दहानंतर घराच्या दाराला कुलूप न लावताच फक्त कडी अडकवून आई, पत्नी व मुलांसह दाराबाहेरच्या रस्त्यावर झोपलेले असताना चोरांनी दाराची कडी उघडून आत प्रवेश केला. बाजूच्या खोलीतील चाव्या घेऊन व कपाट उघडून त्यामधील एक लाख ५८ हजार रुपये किंमतीची सोने चांदीची वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आणि आठ हजार रुपये रोख याप्रमाणे एकूण दोन लाख ३८०० रुपयांचा ऐवज लंपास केला.

 हेही वाचा : Corona Update : परभणीत ६० वर्षीय व्यक्ती काल पॉझिटिव्ह, आज मृत्यू 

 

चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद

दुसरे दिवशी शनिवारी (ता.२९) पहाटे वाटोळे यांची आई मथुराबाई वाटोळे यांना जाग आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. यावेळी परिसरात फिरून पाहिले असता घरापासून सुमारे पाचशे मिटरवर दागिन्यांच्या पावत्या व वाटोडे यांच्या मुलीचे मेकअप किट आढळून आले. या प्रकरणी मिलिंद वाटोडे यांनी शनिवारी जिंतूर येथे पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी वेगवेगळ्या कलमान्वये चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of two children who went for a swim Parbhani News