कर्जबाजारी झालेल्या जिंतूर आगारातील बस चालकाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mujhaffar Khan

एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याचा मागणीसाठी गेले अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचऱ्यांचा संप सुरू आहे.

कर्जबाजारी झालेल्या जिंतूर आगारातील बस चालकाची आत्महत्या

जिंतूर (जि. परभणी) - संप (ST Strike) मिटेना, पाच महिन्यापासून वेतनही (Salary) मिळेना त्यामुळे कर्जबाजारी (Loan) झालेल्या जिंतूर आगारातील बस चालक (Bus Driver) मुझफ्फर खान जफर खान पठाण (वय ४५) याने तालुक्यातील भोगाव-देवी शिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना शनिवारी (ता.१२) सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली.

एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याचा मागणीसाठी गेले अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचऱ्यांचा संप सुरू आहे. सदरील प्रकरणाच्या सुनावणीकरिता न्यायालयाकडून सतत तारीख वाढत आहे त्यामुळे एसटीचे विलीनीकरण काही होईना, अन् संपही मिटेना, संपामुळे वेतनही रखडले.त्यामुळे संपात सामील असलेले मुझफ्फर खान यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली.कौटुंबिक गाडा हाकताना ते कर्जबाजारी बनले.त्यामुळे व्यथित झालेले मुझफ्फर खान यांनी अखेर आत्महत्या करून मृत्यूला कवटाळले.

हेही वाचा: बांधकामाच्या टाकाऊ साहित्यापासून गट्टू!

शुक्रवारी (ता.११) पुन्हा तारीख वाढल्याचे समजल्यावर सायंकाळी ते चारच्या सुमारास ते जिंतूर बसस्थानकावरून गावाकडे (भोगाव) येथे परत जाऊन संध्याकाळी भोगाव शिवारातील गोमा खिल्लारे यांच्या विहिरीवर पोहोचून विषारी द्रव्य प्राशन करून त्याने विहिरीत उडी मारली. शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला.

मृतदेह रुग्णालयात आणल्यानंतर मयताच्या नातेवाईकांनी ५० लाख रुपये नुकसानभरपाई आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले व आश्वासन मिळेपर्यंत मृतदेह आगारात नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु ऐनवेळी पोलीस निरीक्षक दीपक शिंदे यांनी मध्यस्थी करत परभणी येथे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जिंतूर येथे बोलावले. सायंकाळी तीन वाजेपर्यंत तरी प्रकरण मिटले नव्हते.

टॅग्स :bus DriverST Strike