Farmer Kakasaheb Mugdal
sakal
आडूळ - नापिकी व वाढत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरुण शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (ता. १७) पैठण तालुक्यातील एकतुनी येथे घडली. काकासाहेब कडुबा मुगदल (वय ३८, रा. एकतुनी, ता. पैठण) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.