
गेवराई : विधानसभेच्या रणधुमाळीत महायुतीच्या सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते.परिणामी शेतकरी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत कर्जमाफीची आस लावून बसला होता;मात्र, अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतरही कर्जमाफ न केल्याने पिककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.त्यातच नूतनीकरण(नवं-जुनं)केलं नसल्याने येत्या खरिपाच्या पेरणीसाठी पैसा आणायचा कुठून? असा प्रश्न पडलेला आहे. यामुळे सावकारांच्या घराची उंबरे झिजलेल्या शिवाय पर्याय नसल्याने सावकारी पाशात अडकवून गळ्याचा फास घट्ट होण्याची शक्यता वाढली आहे.