esakal | परिक्षेविना विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय दुदैवी, पास न करण्याच्या निर्णयावर ईसा संघटना ठाम 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

राज्यातील शाळांमध्ये गेल्या एक वर्षापासून ऑनलाईन शिक्षण देण्याचे काम शिक्षक करत आहेत. शिक्षक आपल्या परिने ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. 

परिक्षेविना विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय दुदैवी, पास न करण्याच्या निर्णयावर ईसा संघटना ठाम 

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : वर्षभर गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पास न करण्याच्या निर्णयावर ईसा संघटना ठाम कोरोनामुळे गेल्यावर्षी मार्च पासून शासनाने शाळा बंद केल्या तरी राज्यातील शाळांमध्ये गेल्या एक वर्षापासून ऑनलाईन शिक्षण देण्याचे काम शिक्षक करत आहेत. शिक्षक आपल्या परिने ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. 

त्याच बरोबर पालकांनीही ऑनलाईन शिक्षणासाठी सहकार्य केले आहे. मधल्या काळात पाचवीपासून प्रत्यक्ष वर्ग ही भरविण्यात आले. राज्यातील जवळपास सर्वच शाळा ऑनलाईन परिक्षेसाठी तयारी केलेली असतांना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अचानक पहिला ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना परिक्षा न घेता पास करण्याचा निर्णय जाहीर केला. शाळांची ऑनलाईन परिक्षेची तयारी असतांना असा निर्णय घेणे शैक्षणिकदृष्ट्या दुर्दैवी आहे. 

हेही वाचा - हदगाव तालुका हादरला : लिंगापुर येथे २९ कोरोना बाधित आढळल्याने खळबळ

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे सलग दुसऱ्या वर्षी मुल्यमापन होणार नाही व यामुळे चुकीच्या पायंडा पाडला जात आहे. जेणेकरुन भविष्यात राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. ऑनलाईन परिक्षा घेण्यात काहीही हरकत नव्हती, त्यामुळे कोरोना वाढणार नव्हता. प्रत्येक शाळेमध्ये १० ते १५ टक्के विद्यार्थी असे आहेत जे संपूर्ण वर्ष गैरहजर आहे. अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पास न करण्याच्या निर्णयावर ईसा संघटना ठाम आहे. जे विद्यार्थी वर्षभर गैरहजर ज्यांनी ऑनलाईन, ऑफलाईन कोणताच शिक्षण घेतलेला नाही अशा विद्यार्थ्यांकडून फिस न आकरता त्यांना त्याच वर्गात रिपीट केले जाईल. 

ज्यांनी पुर्ण वर्ष अभ्यास केलेला नाही अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पास करणे म्हणजे त्यांचे शैक्षणिक नुकसान करण्यासारखे होईल. या व्यतिरिक्त कोरोनामुळे अनेक पालकांनी स्वच्छेने यावर्षी मुलांना त्याच वर्गात रिपीट करण्याचा निर्णय घेतलेला आहे व तशी विनंती शाळेच्या प्रशासनाकडे पालक करीत आहे. शासनाने वर्षभर गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांना पास न करण्याचा व स्वच्छेने ज्या पालकांना आपल्या मुलांना यावर्षी रिपीट करायचा आहे. त्यांना पर्याय उपलब्ध करुन देण्याची ईसा संघटनेची मागणी असल्याचे संघटनेचे सचिव दिलीप बांगर यांच्यासह पदाधिकारी यांनी केली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image