Declare a Drought Congress Holds Massive Bullock Cart and Tractor Rally in Umarga
sakal
उमरगा, (जि. धाराशिव) - पावसाच्या दीर्घ ताणानंतर उमरगा आणि लोहारा तालुक्यात खरीप पिके पूर्णपणे वाया गेली असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपूर्ण तालुक्यात तात्काळ 'कोरडा दुष्काळ' जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मुख्य मागणीसाठी उमरगा तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस आणि धाराशिव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (ता. ११) तहसील कार्यालयावर भव्य बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आश्लेष मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पार पडला.