Beed News: एकएक श्वासासाठी बाळ लढलं, पण नियतीच्या मनात काही वेगळचं होतं...; बीड जिल्ह्यातील घटनेने हळहळ
Ambajogai Case: स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात मृत घोषित केलेल्या नवजात बाळाने घरी नेल्यानंतर हालचाल केल्या. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच अखेरचा श्वास घेतला.
अंबाजोगाई : मागील चार दिवसांपासून स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या ‘त्या’ बाळाने शुक्रवारी (ता.११) रात्री अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, या घटनेचा चौकशी अहवाल येणे अद्याप बाकी आहे.