Parbhani News : विहिरीत आढळला कुजलेला मृतदेह; सेलूमधील घटना
Crime News : सेलू तालुक्यातील नांदगाव शिवारातील विहिरीत रविवारी अनोळखी व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळून आला. आत्महत्या की घातपात याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
देवगावफाटा : नांदगाव (ता. सेलू) शेतशिवारातील एका विहिरीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह रविवारी (ता. ११) दुपारी आढळून आला. मात्र, हा मृतदेह कुजलेला असल्याने ही आत्महत्या की घातपात, याचा शोध पोलिस घेत आहेत.