Wild Animals News
Wild Animals Newsesakal

मुक्या जनावरांना पाणीटंचाईचा फटका, पाण्याच्या शोधात हरणाच्या पाडसाचा मृत्यू

उन्हाची तीव्रता वाढताच शेत शिवारात पाणवठे कोरडे पडत आहेत.
Published on

चारठाणा (जि. परभणी) : वाढत्या तापमान व पाणीटंचाईचा सामना वन्यप्राण्यांनाही करावा लागत आहे. चारठाणा परिसरातील नदी नाले, छोटे तलाव कोरडे झाल्यामुळे वन्यप्राणी सैरभैर भटकंती करीत आहेत. पाण्याच्या शोधात चारठाणा येथील शेत शिवारात हरणाच्या पाडसाचा मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी (ता.१४) उघडकीस आली. उन्हाची तीव्रता वाढताच शेत शिवारात पाणवठे कोरडे पडत आहेत. या भागात कृत्रिम पाणवठे नसल्यामुळे वन्यप्राण्यांची (Wild Animals) भटकंती सुरू आहे. सद्यःस्थितीत पाण्याची पातळी घटली आहे. (Deer Baby Died Due To Water Shortage In Parbhani)

Wild Animals News
औरंगाबादमधील राम नवमी मिरवणुकीचा Viral Video; मशिदीजवळून जाताना 'भाईचारा'

चारठाणा येथील शिवारात गुरुवार येथील शेतकरी सचिन घाटुळ यांच्या शेतात मजूर ज्वारी काढत असताना हरणाच्या पिलाचा मृत्यू झाल्याचे दिसले. पाण्याच्या शोधात असलेल्या पिलाचा तडफडून मृत्यू झाल्याचा अंदाजे दावा मजूर करीत आहेत. या परिसरात पाण्यासाठी व चाऱ्यासाठी हरणांचे कळप फिरतात. गेल्या आठवड्यात जिंतूर (Jintur) तालुक्यात पाण्याच्या शोधात निलगायी विहिरीत पडल्याची घटना घडली होती.

Wild Animals News
अखंड भारताविषयी बोलू नका, असदुद्दीन ओवैसींचा मोहन भागवतांना सल्ला

नैसर्गिक पाणीसाठ्यात दीर्घकाळ पाणी टिकते. मात्र पाण्याचा उपसा होत असल्याने वन्य प्राण्यासाठी पाणीटंचाई (Water Scarcity) निर्माण होते. दरम्यान, तीव्र पाणीटंचाई लक्षात घेऊन लवकरच पाणवठे निर्माण करण्याची गरज आहे. (Parbhani)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com