National Highway : महामार्गावरील वृक्षतोडीमुळे गावांची ओळख पुसली, सावली हरवली; लिंब, वटवृक्षाऐवजी फूलले आहे कागदी फुले!

Deforestaion : ऊन, पावसात वाटसरु ,वाहनधारकांना ही झाडे वाटत होती आधार ; चौपदरीकरणाच्या कामात हजारो झाडांची कत्तल
धुळे -सोलापुर:- महामार्गावर कडूलिंब,वट वृक्षाऐवजी केवळ कागदी फुलांची लागवड केल्याने सावली दुरापास्त होऊन रस्त्याच्या सौंदर्यात भर पडली.
धुळे -सोलापुर:- महामार्गावर कडूलिंब,वट वृक्षाऐवजी केवळ कागदी फुलांची लागवड केल्याने सावली दुरापास्त होऊन रस्त्याच्या सौंदर्यात भर पडली. esakal

Tree Cutting : आठ वर्षापुर्वी दुपदरी असलेल्या धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. चौपदरीकरणापूर्वी या महामार्गाच्या दुतर्फा हजारो डेरेदार कडुलिंब,बाभूळ व वटवृक्षाची झाडे अस्तित्वात होती. ही झाडे गावागावावर वैभव व ओळखीची साक्ष देत उभे होते. रस्त्याने जाणारे वाहनधारक, प्रवाशी केवळ झाडांच्या खुणावरून आपण कोणत्या गावाजवळ आलो हे अचुकपणे ओळखत असे.

एवढेच नव्हे तर ऊन, पावसात वाटसरु ,वाहनधारकांना ही झाडे आधार वाटत होती. परंतु चौपदरीकरणाच्या कामात बाधा ठरणारे छत्रपती संभाजीनगर पासुन पाचोड पर्यंतची जवळपास पंचवीस हजारां वर मोठमोठी झाडे तोडण्यात आली, अन गावाची ओळख पुसण्यासोबतच रखरखत्या उन्हात सावली देणारा आसराही दुरापास्त झाला.

धुळे -सोलापुर:- महामार्गावर कडूलिंब,वट वृक्षाऐवजी केवळ कागदी फुलांची लागवड केल्याने सावली दुरापास्त होऊन रस्त्याच्या सौंदर्यात भर पडली.
Solapur News : यंदा खरिपाचा पेरा वाढण्याची शक्यता कृषी विभागाचे नियोजन; ३० हजार ५०८ हेक्टरची वाढ शक्य

या महामार्गावरील छत्रपती संभाजीनगर ते पाचोड या पंचावन्न किलोमिटर अंतरात पैठण तालुक्याची १०, संभाजीनगर तालुक्यातील सात तर अंबड तालुक्यातील चार गावे येतात.

या गावांच्या थांब्यावर असणाऱ्या महाकाय डेरेदार वृक्षांवर रात्रीला पक्ष्यांची भरणारी शाळा, किलबिलाट दृष्टीआड झाली.या महामार्गावरील झाडे तोडतांना ठेकेदार व बांधकाम विभागाने तिप्पट विशिष्ट व उच्च दर्जाची झाडे लावण्याचे आश्वासन दिले होते.

प्रात्यक्षिक म्हणुन त्यांनी कचनेर फाटयाजव ळ आपटा, कडुलिंब, शिरस, बदाम आदी सात जातीच्या झाडांचे प्रत्यारोपण केले; मात्र ते केव्हाच वाळुन गेले. हिरवाईने नटलेला महामार्ग राष्ट्रीय प्राधिकरण विभागाच्या दुर्लक्षित कसभारामुळे उनाड - बोडका झाला.

या घटनेस आठ वर्षाचा कालावधी उलटला तरी अद्याप दीर्घकाळ टिकणारी नवीन झाडे लावण्याची कुणीच तसदी न घेता दुभाजकाच्या मध्यभागी ठिकठिकाणी केवळ रंगी बेरंगी कागदी फुलांचे झाडे लावण्यात आली असून महामार्ग रंग -बेरंगी फुलांनी आकर्षक वाटत असला, तरी जून्या झाडांचे वैभव तो हरवून बसला आहे.

धुळे -सोलापुर:- महामार्गावर कडूलिंब,वट वृक्षाऐवजी केवळ कागदी फुलांची लागवड केल्याने सावली दुरापास्त होऊन रस्त्याच्या सौंदर्यात भर पडली.
Trees Protect Environment : पर्यावरणासाठी नेटिझन्सचे सोशल मीडियाद्वारे आवाहन

"शासनाकडुन पर्यावरणाचा समतोल राखणेकामी कोटयावधी रुपये खर्चुन 'झाडे लावा - झाडे जगवा'चा कार्यक्रम राबविला जात आहे. तर दुसरीकडे अस्तित्वात असलेले लाखो झाडांचा बळी देऊन निसर्गाचा -हास केला आहे. महामार्गावरील तोडलेल्या एका झाडामागे पाच झाडे लावण्याचे नियोजन होते मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष झाले, महामार्ग प्राधिकरणाने तातडीने दुतर्फा उच्च व दीर्घकाळ टिकणाऱ्या झाडाची लागवड करुन त्याची जोपासना करण्याचे ठेकेदार,बांधकाम विभागाला आदेश दयावेत',असे मत धनराज भुमरे (सामाजिक कार्यकर्ता) यांनी व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com