Degloor Market Committee : शेतकरी आणि एफपीओ निविदेच्या प्रक्रियेबाहेर? देगलूर बाजार समितीच्या अटींवर माजी उपसभापती बालाजीराव कनंकटे यांचा सवाल

Agricultural Land E Tender Controversy : देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागा विक्रीसाठी प्रसिद्ध केलेल्या ई-निविदेतील कठोर आर्थिक व तांत्रिक अटींवर शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. निविदा रद्द करून फेरनिविदेची मागणी होत आहे.
Agricultural Land E Tender Controversy

Agricultural Land E Tender Controversy

esakal

Updated on: 

देगलूर : देगलूर कृषी उत्पन्न बाजार समिती च्या गट क्रमांक ८३६, क्षेत्रफळ ०.३२ आर येथील जागेच्या विक्रीसाठी प्रसिद्ध केलेल्या ई-निविदा प्रक्रियेवर शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. निविदेमध्ये घालण्यात आलेल्या आर्थिक व तांत्रिक पात्रतेच्या कठोर अटींमुळे सर्वसामान्य शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीओ) तसेच स्थानिक इच्छुकांना प्रत्यक्ष सहभाग घेणे अशक्य होत असल्याने ही निविदा काही मोजक्या व्यापाऱ्यांना लाभदायक ठरेल, असा आरोप बाजार समितीचे माजी उपसभापती बालाजीराव कनंकटे यांनी केला आहे .

Loading content, please wait...