

Murder Over Petty Dispute in Degloor
Sakal
देगलूर : शहरातील नवीन सराफा भागातील अंबिका ऑईल मिलच्या बाजूस असलेल्या देशी दारू दुकानात दोन व्यक्तींमध्ये झालेल्या किरकोळ व जुन्या वादावरून आरोपीने तीक्ष्ण व धारदार वस्तूने मानेवर वार केल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी ता. ०९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० वाजताच्या दरम्यान घडली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली . या प्रकरणातील आरोपी स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. ऐन निवडणुकीच्या काळात शहरात खून झाल्याने काही काळ खळबळ उडाली.