Ineffective Crackdown: Citizens Question Transparency of Gutka Raids in Degloor
sakal
देगलूर : देगलूर तालुक्यात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा काळाबाजार बोकाळला असताना पोलीस प्रशासनाच्या कारवाया केवळ “डोंगर पोखरून उंदीर पकडण्यासारख्या” ठरत असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. सलग धाडीत लाखो रुपयांची वाहने जप्त होत असताना गुटख्याचा साठा मात्र नगण्य आढळत असल्याने या कारवायांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.