Nanded News : मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे देगलूरकरांमध्ये भीती; पिसाळलेल्या कुत्र्याने सात जणांना चावा घेतल्यानंतर नागरिकांकडून पालिका प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

Stray Dog Attack in Degloor, Nanded : नांदेड जिल्ह्यातील देगलूरच्या मदिना कॉलनीत पिसाळलेल्या कुत्र्याने सात जणांना चावा घेतला. काही जखमी गंभीर असून एका वृद्धाला पुढील उपचारांसाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.
Stray Dog Attack in Degloor

Stray Dog Attack in Degloor

sakal
Updated on: 

देगलूर : देगलूर शहरातील नरंगल रोडवरील मदिना कॉलनी परिसरात शुक्रवारी सकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घालत सात जणांना चावा घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. जखमींमध्ये नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याचाही समावेश असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर देगलूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून एका वृद्ध नागरिकाला पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.

Loading content, please wait...