

Late Night House Break-in on Bhaktapur Road, Deglur
Sakal
देगलूर : शहरातील भक्तापूर रोड परिसरातील सुभाष नगर मधील एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी किरायाने राहणाऱ्यांचे घर शुक्रवारी ता. १६ च्या मध्यरात्री चोरट्याने फोडले. मात्र त्याच्या हाती काही लागले की नाही हे मात्र पुढे आलेले नाही .चोरी करताना त्याने शेजारील घराला बाहेरून कडी लावून दुसऱ्या मळ्यावर जाण्याचा प्रयत्न केला .ही घटनाही सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून सध्या संक्रातीच्या सणानिमित्त महिलांच्या वाण देवाणघेवाणीचा कार्यक्रम सुरू असल्याने सायंकाळी महिला घराबाहेर पडत असल्याने त्यांच्यात भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे .