lightning
sakal
देगलूर - तालुक्यात गुरुवारी (ता. ४) झालेल्या मेघगर्जनेसह पावसादरम्यान भोकसखेडा शिवारात वीज कोसळून शेळीपालनासाठी उभारलेल्या गोठ्याला भीषण आग लागली. या दुर्घटनेत २२ शेळ्या, १५ शेळींची पिल्ले, २० कोंबड्या, २० क्विंटल आद्रक तसेच ठिबक सिंचन साहित्य व अन्य शेतीची अवजारे जळून खाक झाली. या आगीत शेतकरी हनुमंत शामराव डाकोरे यांचे सुमारे आठ लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला आहे.