

NCP Wins Majority and Mayor Seat
देगलूर : देगलूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक साठी गेल्या ता. २ डिसेंबर रोजी मतदान झाले होते .त्या मतदानाची मतमोजणी ता . २१ डिसेंबर रोजी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात होऊन यात सत्ताधारी काँग्रेसने १२ जागा जिंकल्या तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसने १५ जागा जिंकत थेट नगराध्यक्ष पदही ताब्यात घेतले. थेट नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयमाला बालाजीराव टेकाळे यांना १४९६५ तर काँग्रेसच्या उमेदवार मनोरमा निलमवार यांना १४७२१ मते, तर शिवसेनेच्या उमेदवार जयश्री बाळू काबदे यांना ८५७ मिळाली. तर भाजपाच्या निलाबाई गंगाधरराव भांगे यांना १४०९ मते मिळाली.