Deglur NCP leadership change: देगलूर राष्ट्रवादीत खांदेपालट; शिवाजीराव कनकंटे तालुकाध्यक्ष, मंगल आलुरकर व नारायण पाटील यांना जिल्हा उपाध्यक्षपदाची बढती

देगलुरात राष्ट्रवादी काँग्रेसची नवी मांडणी; शिवाजीराव कनकंटे तालुकाध्यक्ष, मंगल आलुरकर व इतरांना जिल्हा पातळीवर बढती देत संघटन बळकटीचा प्रयत्न
Reviving the Party Base: Leaders Focus on Strengthening Organization Under Ajit Pawar’s Leadership

Reviving the Party Base: Leaders Focus on Strengthening Organization Under Ajit Pawar’s Leadership

Sakal

Updated on

देगलूर: येथील राष्ट्रवादी काँग्रेस सुनेत्राताई पवार पक्षात तालुकास्तरावर खांदेपालट करण्यात आली असून ज्येष्ठ कार्यकर्ते तथा जि. प. चे माजी सदस्य शिवाजीराव कनंकंटे यांची तालुका अध्यक्षपदावर वर्णी लावण्यात आली असून बाजार समितीचे माजी सभापती मंगल देशमुख आलुरकर यांना जिल्हा उपाध्यक्ष पदावर बढती देण्यात आली आहे. पक्ष स्थापनेपासून तालुका अध्यक्षपदावर युवा कार्यकर्ते राहुल देसाई देगावकर हे कार्यरत होते तर शहराध्यक्षपदी देवेंद्र मोतेवार हे होते. सध्या शहराध्यक्ष पदी असलेली निवड "जैसे थे" ठेवण्यात आली असून इतर कार्यकारणीत माजी विस्तार अधिकारी दयानंद सूर्यवंशी यांची जिल्हा सचिव पदावर वर्णी लावण्यात आली आहे. तर युवा कार्यकर्ते नारायण सुरेश पाटील शेळगावकर यांना जिल्हा उपाध्यक्ष पद देण्यात आले आहे. प्रशांत पाटील मानूरकर यांना युवा तालुका अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com