

Water Scarcity Declared in Degloor Taluka
sakal
देगलूर : खरीप हंगामातील मोठ्या पर्जन्यतुटीमुळे राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांसह देगलूर तालुका पुढील एक वर्षासाठी अथवा पुढील आदेशापर्यंत 'पाणी टंचाई क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.