देगलूर - देगलूर आगाराची एसटी बस वझरवरून देगलूरकडे येत असताना गवंडगाव जवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात २८ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. यातील चार प्रवाशास पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आल्याची माहिती आगार प्रमुख श्री संजय अकुलवार यांनी दिली.