
Politicians Ready for ZP Polls, Ignoring Farmers' Unresolved Issues
Sakal
देगलूर : जिल्हा परीषदेची ओळख मिनी मंत्रालय म्हणूनच आहे . मिनी मंत्रालयावर जाण्यासाठी गावकुसातील कारभारी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी कंबर कसली असुन हवसे, नवसे, गवसे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत .ग्रामीण भागात गेल्या सहा महिन्यापासून अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे. आता रब्बी पूर्व मशागतीचा हंगाम असून ते करायलाही पाऊस ऊसंत द्यायला तयार नाही.