
केज : तालुक्यातील एक लाख १४ हजार ८४६ हेक्टर भौगोलिक क्षेत्रफळापैकी एक लाख पाच हजार ११२ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र आहे. मागील दोन वर्षांत मृग नक्षत्रात खरिपाच्या पेरण्या उरकल्या होत्या. मात्र, यावर्षी मे महिन्यातच जोरदार पाऊस झाल्याने मृग नक्षत्रातच उपलब्ध ओलीवर ७४ हजार ६१२ हेक्टर क्षेत्रात खरीप हंगामाची पेरणी झाली असून, मृग नक्षत्र कोरडे गेल्याने उर्वरित ३० हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावर अद्यापही पेरणी झालेली नाही.