शेतीचा फेर नावावर करण्यासाठी लाचेची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

  या तक्रारीत ताडकळस सज्जाचे तलाठी अनिल सखारामपंत खळीकर यांनी शेतीचा फेर नावावर करून देण्यासाठी सात हजार ५०० रुपयांची लाच मागितली असल्याचे नमूद केले होते.

परभणी : शेतीचा फेर नावावर लावून घेण्यासाठी साडेसात हजार रुपयांची लाच मागणाऱ्या एका तलाठ्याविरोधात ताडकळस पोलिस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ता. नऊ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ता. नऊ जानेवारी रोजी तक्रार दिली होती. या तक्रारीत ताडकळस सज्जाचे तलाठी अनिल सखारामपंत खळीकर यांनी शेतीचा फेर नावावर करून देण्यासाठी सात हजार ५०० रुपयांची लाच मागितली असल्याचे नमूद केले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणी ता. नऊ जानेवारी रोजी पंचासमक्ष कारवाई करण्यात आली. ठरलेल्या दिवशी थोडे पैसे देतो असे सांगितले. त्या वेळी रक्कम स्वीकारण्यास खळीकर यांनी सहमती दिली. परंतु, खळीकर यांना संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारण्यास नकार दिला. म्हणून त्यांच्याविरुद्ध ताडकळस पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - नांदेडात डॉक्टर्स तयार करण्याचा कारखाना

सदरील कारवाई पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधीक्षक अर्चना पाटील, भरत हुंबे, अमोल कडू, श्री. शकील, श्री. कुलकर्णी, श्री. धबडगे, श्री. चट्टे, श्री. हनुमंते, श्री. जहागीरदार, शेख मुखीद, शेख मुक्तार, श्रीमती टेहरे, श्री. चौधरी, श्री. कदम यांनी मिळून केली.

हेही वाचा ....

 शेतातील भिजविण्याचे पाणी का जाऊ दिले म्‍हणून मारहाण
हिंगोली : तालुक्‍यातील नरसी नामदेव पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रिधोरा येथे शेतातील भिजविण्याचे पाणी का जाऊ दिले, म्‍हणून एकास मारहान करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकावर शनिवारी (ता. ११) गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरसी नामदेव पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रिधोरा येथील वैजनाथ नारायण गाडे यांनी गजानन गाडे यांना शेतातील भिजविण्याचे पाणी का जाऊ दिले. या कारणावरून हातातील काठीने पाठीवर, पायावर व हातावर मारून दुखापत केली. व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद गजानन गाडे यांनी नरसी पोलिस ठाण्यात केली. त्‍यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून तपास पोलिस करीत आहेत.

हेही वाचा -  लाचखोर हवालदार लाचेच्या जाळ्यात

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for bribe to rename agriculture