जिल्ह्यातील बँकांमध्ये नोटा उपलब्ध नसल्याने पर्याय म्हणून नाणे उपलब्ध करून देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली.
जिल्ह्यातील बँकांमध्ये नोटा उपलब्ध नसल्याने पर्याय म्हणून नाणे उपलब्ध करून देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली. sakal

Coin Shortage : हिंगोली जिल्ह्यातील नाणेटंचाई दूर करण्याबाबत ‘एसबीआय’कडे मागणी

जिल्ह्यातील बँकांमध्ये नोटा उपलब्ध नसल्याने पर्याय म्हणून नाणे उपलब्ध करून देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली.
Published on

हिंगोली : जिल्ह्यातील व्यापार पेठेत पाच, दहा, वीस रुपयांच्या नोटांची टंचाई असल्यामुळे व्यापाऱ्यांना अडचण निर्माण होत आहे. यावर उपाययोजना म्हणून हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने स्टेट बँक ऑफ इंडिया जिल्हा शाखा हिंगोली यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यातील बँकांमध्ये नोटा उपलब्ध नसल्याने पर्याय म्हणून नाणे उपलब्ध करून देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातील व्यापारपेठांमध्ये सर्वत्र पाच, दहा, वीस रुपयांच्या नोटा दिसेनाशा झाल्या आहेत. चलनात आहेत त्या नोटा जीर्ण झाल्यामुळे ग्राहक व व्यापारी यांच्यामध्ये तक्रारी वाढत आहेत.

दहा रुपयांच्या नोटा चलनातच दिसत नाहीत म्हणून हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडिया जिल्हा शाखा हिंगोलीच्या व्यवस्थापकांना भेटून या संबंधाने निवेदन देण्यात आले.

व्यवस्थापनाने याबाबतीत जिल्ह्यातील बँकांना नाणे पुरवठा करण्याच्या दृष्टीने लवकरच उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले. यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अनिल नैनवाणी, अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, शहराध्यक्ष सुमीत चौधरी, प्रकाश इंगोले आदींनी व्यवस्थापनाशी चर्चा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com