

Dengue Tragedy in Kannad 12 Year Old Boy Dies While Father and Sister Remain in Intensive Care Unit
sakal
-संतोष निकम
कन्नड: तालुक्यातील करंजखेड परिसरातील सुराशेवाडी येथील १२ वर्षीय सोहम सुभाष ससे या शाळकरी मुलाचा डेंग्यूच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, सोहमचे वडील सुभाष ससे व बहीण सप्तशोरी यांचीही प्रकृती बिघडून त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे सोहमचा मृतदेह तब्बल सहा दिवस रुग्णालयाच्या शीतगृहात ठेवावा लागला.