डेंगी सदृश्‍य तापाने तरुणीचा मुत्यू

आरेफ पटेल
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

डेंगी सदृश्‍य तापाने टाकळी राजेराय (ता.खुलताबाद) येथील कीर्ती श्रीधर टाकळकर या सोळा वर्षीय तरुणीचा मंगळवारी (ता.17) मृत्यु झाला. गेल्या काही दिवसांपासुन या परिसरात तापेच्या रुग्णात वाढ होत असून थंडी येणे, खोकला व काविळ या सारख्या आजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.

टाकळी राजेराय (औरंगाबाद) ः डेंगी सदृश्‍य तापाने टाकळी राजेराय (ता.खुलताबाद) येथील कीर्ती श्रीधर टाकळकर या सोळा वर्षीय तरुणीचा मंगळवारी (ता.17) मृत्यु झाला. गेल्या काही दिवसांपासुन या परिसरात तापेच्या रुग्णात वाढ होत असून थंडी येणे, खोकला व काविळ या सारख्या आजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. यातच नऊ दिवसापुर्वी अनिता ज्ञानेश्वर श्रीखंडे या पंचवीस वर्षीय विवाहितेचा डेंगी सदृश्‍य आजारातच उपचारादरम्यान मुत्यु झाला होता.

गेल्या काही दिवसांपूर्वी कीर्तीची तापेमुळे तब्येत खालावत असल्यामुळे तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु चार दिवसाच्या उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी तिचा मृत्यू झाला.

ग्रामस्थांच्या रोषानंतर आरोग्य पथक दाखल
नऊ दिवसात दोन घटना घडल्यामुळे आरोग्य विभागाबद्दल ग्रामस्थांनी रोष व्यक्त करत गदाना आरोग्य केंद्रात जाऊन संताप व्यक्त केला. टाकळी राजेराय येथे उपकेंद्र असुनही त्याचा कोणताच फायदा होत नसुन या ठिकाणी कोणताच कायमस्वरुपी आरोग्य कर्मचारी नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. कीर्ती हिचे निधन झाल्याचे कळल्यानंतर ग्रामस्थानी गदाना गाठत डॉक्‍टरांना धारेवर धरले. यामुळे गदाना केंद्राचे डॉ.पुंगळे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक स्थापन करुन राजेराय टाकळी गाठत तपासणी करण्यास सुरवात केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dengue Like Disease Claimed Girl Life