Soham Sase
sakal
कन्नड - ‘देवाजवळ एवढीच प्रार्थना करते, माझ्यावर जी वेळ आली ती कोणावरही येऊ नये. एकीकडे मुलगा हॉस्पिटलमध्ये मृत पडलेला, दुसरीकडे पती आयसीयूमध्ये, एकीकडे मुलगी तिसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट. तिकडे मुलीला भेटू शकत नाही, तिच्या वडिलांना भेटू शकत नाही, मुलाला आई भेटू शकत नाही. सगळ्यांना धीर देण्यासाठी स्थीर सहा दिवस बसावे लागले...’ या शब्दांत करंजखेड येथील सुराशेवाडी भागातील १२ वर्षीय सोहम ससेच्या आईने आपल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली.