उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : ४० जण अटक, दोन लाखांचा ऐवज जप्त 

 प्रल्हाद कांबऴे
गुरुवार, 17 मे 2018

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात छापे टाकले. पथकांनी ४० जणांना अटक करून दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. 

नांदेड : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात छापे टाकले. पथकांनी ४० जणांना अटक करून दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. 

उत्पादन शुल्क जिल्हा अधिक्षक निलेश सांगडे यांच्या आदेशावरून भरारी पथकांनी एक मे ते १६ मे दरम्यान जिल्ह्यातील विविध भागात अवैधरित्या देशी दारु, हातभट्टी व सिंदी अड्यावर छापे टाकले. यावेळी एकूण ५० गुन्हे दाखल केले, यात ३९ वारस, तर ११ बेवारस गुन्ह्यात ४० जणांना अटक केली आहे. 

घटनास्थळावरून २०० लीटर देशी दारु, २५४ लिटर हातभट्टी, ८७६ लिटर ताडी आणि ४०० लिटर रसायण जप्त केले. त्यासोबतच तीन दुचाकी व तीन चारचाकी वाहने जप्त करून वरील चाळीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या पथकांनी पंधरा दिवसात एक लाख ९७ हजार ४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या छापासत्रामुळे अवैध्य दारु विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. यापुढेही अशाच कारवाया सुरू राहतील व अवैध्य दारु विक्रेत्यांनी हातभट्टी व ताडी अवैध्य मार्गाने विक्री करुन नये असे आवाहन श्री. सांगडे यांनी केले आहे. 

Web Title: Department of Excise Duty: 40 arrested, two lakhs of money seized

टॅग्स