depositors Crowd in dnyanradha Bank rumor income tax raid marathi news
depositors Crowd in dnyanradha Bank rumor income tax raid marathi newsSakal

Beed News : सेलूत ज्ञानराधा बँकेत ठेविदारांची गर्दी; श्री. कुटे अडचणीत येतील का?

बीड येथील तिरूमला उद्योग समुहाच्या तपासणीसाठी आयकर विभागाचे काही अधिकारी तपास करत आहेत

सेलू : बीड येथील तिरूमला उद्योग समुहाच्या तपासणीसाठी आयकर विभागाचे काही अधिकारी तपास करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सेलूतील ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या बाबत बाहेर काही अफवा सुरू असल्याने येथिल ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या बाहेर शुक्रवारी (ता.१३ ) रोजी पहाटे एक वाजल्यापासूनच ठेविदार तळ ठोकून बसले आहेत.

बीड येथिल सुरेश कुटे यांची ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेची शाखा आहे. या शाखेत सेलू शहरासह ग्रामीण भागातील व्यक्तींच्या मोठ्या प्रमाणात ठेवी आहेत. बीड येथील तिरूमला उद्योग समुहाचे श्री. कुटे यांचीच ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक सेलूत आहे.

depositors Crowd in dnyanradha Bank rumor income tax raid marathi news
Beed : गुप्तधनाच्या पूजेला विरोध; महिलेवर अनैसर्गिक अत्याचार; पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा

श्री. कुटे यांच्या तिरूमला उद्योग समुहाचे आयकर विभागाचे अधिकरी तपास करित आहेत. त्यामुळे या ग्रुपचेच श्री. कुटे अडचणीत येतील का? आणि आपल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेतील ठेवीवर याचा काही परिणाम होतो. याच भितीने येथिल ठेविदार बँके समोर तळ ठोकून बसले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com