उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या उस्मानाबादच्या दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री पवार यांचा अधिकृत शासकीय दौरा आला असून अन्य दोन मंत्र्याचा अजून दौरा आलेला नसला तरी ते पवार यांच्यासोबतच असल्याचे सांगण्यात येत आहे
ajit pawar
ajit pawarajit pawar

उस्मानाबाद: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) हे उद्या (ता.18) उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून माजी आमदार राहुल मोटे (rahul mote) यांनाही पवार भेटणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याबरोबर अन्य दोन मंत्री देखील असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (dhanajay munde) यांचाही समावेश आहे. तीन दिग्गज नेते माजी आमदार मोटे यांच्याकडे येत असल्याने निश्चितपणे राजकीय चर्चेला वाव मिळणार आहे. गेल्या काही काळापासून राहुल मोटे हे फारसे दिसत नव्हते, पण नेत्यांच्या येण्याने त्यांना बळ मिळणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांतुन व्यक्त होत आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांचा अधिकृत शासकीय दौरा आला असून अन्य दोन मंत्र्याचा अजून दौरा आलेला नसला तरी ते पवार यांच्यासोबतच असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये शुक्रवारी तीन महत्वाच्या मंत्र्यांचे आगमन होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत उत्साह वाढल्याचे दिसून येत आहे. त्यातही राहुल मोटे यांना व्यक्तिगत हा दौरा अतिशय महत्वाचा ठरणार असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार व राहुल मोटे यांच्यामध्ये जवळचे नातेही आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासुन पवार यांचा उस्मानाबादचा हा पहिलाच शासकीय दौरा आहे.

ajit pawar
उस्मानाबादेत पन्नास टक्केच लसीकरण; नागरिकांची लसीकरणाकडे पाठ

मध्यंतरी त्यांचे मेव्हणे व सुनेत्रा पवार यांचे बंधु अमर पाटील यांच्या निधनावेळी त्यांनी तेर येथे हजेरी लावली होती. या घरगुती दौऱ्यानंतर ते जिल्ह्यात आलेले नाहीत. साहजिकच त्यांच्या दौऱ्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. शासकीय विमानाने मुंबईहून सकाळी आठच्या दरम्यान औरंगाबाद येथे पवार यांचे आगमन होणार आहे. औरंगाबाद येथून मोटारीने बीड मार्गे पावणे एक वाजता गिरवली (ता.भूम) येथे त्यांचे आगमन होणार आहे.

नंतर एक तासाचा वेळ त्यानी माजी आमदार राहूल मोटे यांच्याकडे राखीव ठेवला आहे. गिरवली येथून दुपारी पावणे तीन वाजता उस्मानाबाद येथे आगमन व जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हयातील कोविड-19 प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा आणि जिल्हा खरीप हंगामाचा आढावा घेणार आहेत. दुपारी साडेचार वाजता पत्रकार परिषद असणार असून त्यानंतर सव्वा पाच वाजता पवार मोटारीने सोलापूरकडे प्रयाण करणार असल्याचे शासकीय दौऱ्यात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com