लॉकडाउन असतानाही परतले गावात

विनोद आपटे
गुरुवार, 16 एप्रिल 2020


मुक्रमाबादपासून जवळच असलेल्या सावरमाळ येथील अठरा मजूर हे सांगली व हैदराबाद येथे कामाला आहेत. देशात सर्वत्र लॉकडाउन झाल्यानंतर हे मजूर त्या ठिकाणीच अडकून पडले होते.

मुक्रमाबाद, (ता.मुखेड, जि. नांदेड) ः ‘कोरोना’चा संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र व राज्य शासनाने सुरक्षेच्या कारणावरून महिन्यापूर्वीच देशात सर्वत्र लॉकडाउन केले आहे. हा लॉकडाउन तीव्र असातानाही मुखेड तालुक्यातील सावरमाळ येथील आठरा मजूर हे सांगली, हैदराबाद येथून दुचाकींवर गावात आल्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून मंडळ अधिकारी एस. बी. मुंढे यांनी त्यांना गावातीलच शाळेत तात्पुरते विलगीकरण करून ठेवले आहे.

हेही वाचा -  धक्कादायक : परभणी आढळला कोरोना बाधीत पहिला रुग्ण

 

मुक्रमाबादपासून जवळच असलेल्या सावरमाळ येथील अठरा मजूर हे सांगली व हैदराबाद येथे कामाला आहेत. देशात सर्वत्र लॉकडाउन झाल्यानंतर हे मजूर त्या ठिकाणीच अडकून पडले होते. एकीकडे दिवसागणिक कोरोना रुग्णांचा वाढत असलेला मृत्यूचा व वाढत्या रुग्णांचा आकडा हा भयभीत करणारा असून शासन यावर आळा घालण्यासाठी रात्रंदिवस एक करत असून ज्या ठिकाणी मजूर व इतर नागरिक आडकले आहेत त्यांनी त्याच ठिकाणी राहावे.

खाण्याची व राहण्याची व्यवस्था
त्यांच्या राहण्याची व खाण्याची सोय करण्यात राज्य सरकारकडून करण्यात आलेली असतानाही सावरमाळ (ता. मुखेड) येथील हे मजूर आपला व आपल्याला लेकरांचा जीव धोक्यात घालून आडमार्गाने रात्रीचा दुचाकींवरून प्रवास करत गावात परतले आहेत. तर यापैकी हैदराबाद येथून चार जण हे मिळेल त्या वाहनाने व पायी आले. यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून त्यांना गावापासून दूर ठेवून त्याची तपासणी तत्काळ करावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी शासनाकडे केली असून त्या ठिकाणी मंडळ अधिकारी एस. बी. मुंढे यांनी तत्काळ भेट देऊन त्यांना गावातीलच एका शाळेतील सर्व वर्गखोल्यांत विलगीकरण करून त्यांच्या खाण्याची व राहण्याची व्यवस्था केली आहे.

वैद्यकीय तपासणी लवकरच
सर्वत्र लॉकडाउन असून ज्या ठिकाणी मजूर आहेत त्याच ठिकाणी राहण्याचे शासनाचे आदेश असातानाही सावरमाळ येथील आठरा मजूर हे, दुचाकी वरून गावात आले असून याची माहिती जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना कळविली आहे. त्यांचे विलगीकरण करून राहण्याची व खाण्याची सोय केली असून त्यांची वैद्यकीय तपासणी लवकरच करण्यात येणार आहे. असे एस. बी. मुंढे, मंडळ अधिकारी, मुक्रमाबाद यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Despite being locked down, he returned to the village, nanded news