Success Story : वडिलांचे छत्र हरवल्यानंतर दुःखाचा डोंगर सर करत गेवराईतील संस्कृतीचे दहावी परिक्षेत यश, ९२ टक्के घेऊन मारली बाजी
Beed News : वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतरही शिक्षणाची जिद्द न सोडता संस्कृती तळतकर हिने दहावी परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवून यश संपादन केले. तिच्या या संघर्षमय यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गेवराई : दहावी बोर्ड परिक्षा आठवडाभर असतानाच वडिलांचा आपघाती मृत्यू झाला.वडिलांच्या दुःखाचा डोंगर सर करत जिद्द, चिकाटीच्या जोरावर गेवराईतील संस्कृती तळतकर हिने दहावीत ९२ टक्के गुण घेऊन बाजी मारून घवघवीत यश संपादन केले आहे.