
परभणी : महापालिकेने शहरातील शासकीय, महापालिकेच्या जागांवर बस्तान बसवलेल्या अतिक्रमणधारकांना ३१ मार्चपर्यंत स्वतःहून अतिक्रमणे काढून घ्यावीत, अन्यथा मंगळवारपासून (ता. एक) अतिक्रमणांवर हातोडा टाकण्याच्या दिलेल्या इशाऱ्यानंतरही अतिक्रमणे जैसे थे असून, संबंधितांवर कुठलाही परिणाम झाल्याचे दिसत नाही.