
संतोष देशमुख हत्या, पवनचक्की प्रकल्पाला खंडणीच्या निमित्ताने जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा चव्हाट्यावर आला. देशमुख खुन प्रकरणाचा आक्रोश हजारोंच्या मोर्चांतून राज्यभर उमटत आहे. या प्रकरणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चाणाक्षपणे हा क्राऊड आणि क्राय कॅश केला.
पण, प्रकरणाच्या पहिल्या दिवशीपासून या प्रकरणाची झळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षापर्यंत पोचल्याचे पक्ष दिवसेंदिवस बॅकफुटवर जात आहे आणि पक्षाचा प्रमुख घटक दुरावत असल्याचे उपमुख्यंत्री पवारांना का कळत नसावे, असा प्रश्न आहे. नाव वाल्मिक कराडचे असले तरी या साखळीच्या निमित्ताने आता पक्षाच्या प्रतिमेला डाग पडल्याचे नाकारता येणार नाही.