

Devendra Fadnavis Pays Tribute to Vilasrao Deshmukh
Sakal
लातूर : काँग्रेस पक्षासोबत आमची लढाई असली तरी माजी मुख्यंमत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. ते महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेतृत्व आहेत. महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्या नेत्यांचा मोलाचा वाटा आहे, त्यातील प्रमुख नाव हे विलासराव देशमुख आहे, हे सांगताना मला कुठलाही संकोच नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. ७) येथे सांगितले.