
CM Devendra Fadnavis
sakal
Uddhav Thackeray: येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी नगर येथे पक्षाची बैठक घेतली. या बैठकीत मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
मुख्यमंत्री म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने विभागांचे दौरे ठरवलेले आहेत. त्याअंतर्गत मराठवाडा विभागाचा आढावा आज घेतला. नगर पालिका, जिल्हा परिषद आणि महानगर पालिका निवडणुकांच्या संदर्भात काय तयारी झाली आहे, पुढे काय तयारी करायची आहे, युतीच्या संदर्भात विषय यावर चर्चा झाली. बैठकीसाठी आठही जिल्ह्यांचे पदाधिकारी संभाजी नगरला आलेले आहेत.