Latur News: देवणीत ‘सुपरफूड’ चियाने पारंपरिक पिकांना टाकले मागे; एकरी ४-८ क्विंटल उत्पादन; एक लाखापर्यंतचा नफा शक्य

Rapid Growth of Chia Cultivation in Devni: देवणी तालुक्यात पारंपरिक पिकांऐवजी चियाची लागवड झपाट्याने वाढली आहे. कमी खर्च, कमी पाणी आणि रोगमुक्त पीक असल्यामुळे शेतकरी याकडे वळले आहेत.
Latur News

Latur News

esakal

Updated on

देवणी: पारंपरिक पिकांऐवजी चिया लागवडीत तालुक्यात आणि सीमावर्ती भागात झपाट्याने वाढ होत आहे. हरभरा, तूर, गहू, ज्वारीच्या तुलनेत चियामधून अधिक नफा मिळत असल्यामुळे शेतकरी या पिकाकडे वळले आहेत.

यावर्षी चिया बियाणांला बाजारात २१ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कमी खर्च, कमी जोखीम आणि रोगराईपासून बचाव यामुळे उत्पादन हमखास मिळते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. हलक्या जमिनीत आणि कमी पाण्यातही चियाचे पीक चांगले येते. त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी हा एक आदर्श पर्याय ठरतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com