Latur News: देवणी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट; शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान
Crop Damage to Wheat, Chickpea, Jowar, and Vegetables: देवणी तालुक्यात अचानक आलेल्या गारपीट व वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या गहू, ज्वारी, हरभरा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. झाडे तुटली, रस्त्यावर पाणी साचले, विजेचा पुरवठा खंडित झाला, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी नुकसान भरपाईसाठी शासनाकडून त्वरित मदत मिळावी, अशी मागणी करत आहेत.
देवणी: तालुक्यात सोमवारी (ता.१६) सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठा तडाखा दिला. काही ठिकाणी गारपीटही झाल्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली.